भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत साकोली विधानसभा क्षेत्रातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नामांकन अर्ज त्यांच्या अर्धांगिनी मंगला पटोले यांच्या मार्फत साकोली येथील निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आला. यावेळी त्यांची मुलगी प्रिया नाना पटोले, सदाशिव वलथरे, अॅड.दिलीप कातोरे, रवी अग्रवाल, उमेश भेंडारकर,राजू पालीवाल, नेपाल कापगते उपस्थित होते.