भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राकरीता महाविकास आघाडीच्या वतीने राष्टÑवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे माजी आमदार चरण वाघमारे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातुन माजी आमदार चरण वाघमारे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासुन तुमसर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्टÑवादी कॉंग्र्रेस शरद पवार पक्ष व कॉंग्रेस पक्षातील नेतेमंडळींचा चरण वाघमारे यांच्या उमेदवारीला मोठा विरोध सुरू आहे. मात्र हा विरोध झुगारून अखेर राष्टÑवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाने माजी आमदार चरण वाघमारे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. चरण वाघमारे यांची लढत राष्टÑवादी कॉग्रेस अजित पवार पक्षाचे राजु कारेमोरे यांच्याशी होणार आहे.
चरण वाघमारे यांना राष्टÑवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी जाहिर
