भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक सनीज् स्प्रिंगडेल शाळेत दि. २५ आॅक्टोबर २०२४ रोजी ‘किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत शाळेतील वर्ग ७ ते १० वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. किल्ले बनवा या स्पर्धेची संकल्पना सत्यम् एज्युकेशन सोसायटीचे संचालक विनय अंबुलकर, अजित आष्टीकर यांची होती. विद्यार्थ्यांच्या मनात इतिहासा बद्दल जिज्ञासा, विविध संस्कृतीबद्दल आपुलकी, निष्ठा व प्रेम जागृत करण्याकरिता विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांना साकारण्यात सांगण्यात आले.
यात गोवळकोंडा, मुरूड जंजिरा, लाल किल्ला, फतेहपूर सिकरी, जसलमेर किल्ला, चंदेरी किल्ला, चित्तोरगड किल्ला, ग्वाल्हेर किल्ला या किल्ल्यांचा समावेश होता. पर्यावरण पूरक किल्ल्यांच्या निर्मितीमध्ये विद्यार्थ्यांनी परिश्रम व निष्ठेने प्रतिकृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. के.जी.च्या जय निखाडे या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांचे विचार प्रगट केले. या स्पर्धेचे परिक्षण सत्यम् एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुनिल मेंढे, दिनेश साकुरे यांनी केले. किल्ले बनवा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना फक्त चार तासांचा अवधी देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी हा उपक्रम उत्तम रीतीने पार पाडला. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या शेफाली पाल, प्रायमरी प्रमुख समृद्धी गंगाखेडकर के.जी. प्रमुख कल्पना जांगडे यांनी कौतुक केले.