विद्यमान उमेदवारासाठी काम करणार नाही – भाजप कार्यकर्त्यांचे त्रिमुर्ती चौकात आंदोलन

भंडारा : गुरुवार दिनांक २४ आॅक्टोबर २०२४ रोजी त्रिमुर्ती चौक भंडारा येथे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भंडारा विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी त्रिमुर्ती चौक येथे घोषणाबाजी केली. विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामचंद्रजी अवसरे हे ५०००० पेक्षा जास्त मताधिक्याने भंडारा विधानसभा मध्ये निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भंडारा विधानसभेची महायुतीची उमेदवारी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अरविंद भालाधरे यांना मिळाली होती. पण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडोखोरी करून महायुतीच्या सर्व विरोधी पक्षांना हाताशी घेऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव केला. विद्यमान आमदार यांनी युती धर्म पाळला नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला. भंडारा विधानसभा निवडणूक २०२४ भंडारा विधानसभेसाठी महायुतीकडून भंडारा विधानसभा शिंदे गटाच्या नरेंद्र भोंडेकर यांच्या साठी जाहीर करण्यात आली असल्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्यांचा मोठा विरोध होत आहे. विद्यमान आमदार यांनी महायुतीतील घटकपक्षाच्याच विरोधात कामे केली असा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे.

आजच्या आंदोलनाद्वारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भंडारा विधानसभेत भारतीय जनता पार्टीलाच उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. विद्यमान आमदारांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थिती मध्ये आम्ही विद्यमान उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी काम नाही करणार अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलना द्वारे दिली आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे वरीष्ठ नेते रामकुमार गजभिये, भाजपा तालुका अध्यक्ष विनोद बांते, पंचायत समिती उपसभापती प्रशांत खोब्रागडे, भाजपा जिल्हा महामंत्री आशु गोंडाने, भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रुबी चढ्ढा, अनुप ढोके, कृष्णकुमार बत्रा, विजय लीचडे, कैलाश तांडेकर, रोशन काटेखाये, मनोज बोरकर, शिवशंकर लोंढे, श्रद्धा डोंगरे, गोवर्धन साकुरे, प्रशांत निंबोलकर, विजय लिचडे, शंकर लोले, रौनक उजवने, शिव आजबले, शैलेश मेश्राम, सचिन तिरपुडे व मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *