‘आता घरी धान न्यायचे की, फक्त तणीस’ तुडतुड्याने धानाच्या ओंब्याच केल्या फस्त

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सिल्ली परिसरात मोठया प्रमाणात धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र सतत झालेल्या पावसाळी वातावरणाचा फटका धान पिकाला बसला. त्यामुळे धानपिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून तुडतूडयाने धानाच्या ओंब्याच फस्त केल्यामुळे आता धान घरी न्यायचे की, तणस असा यक्ष प्रश्न शेतकºयांना पडला असल्याने यामुळे सिल्ली परिसरातील शेतकरी संकटात सापडले असून तोंडाशी आलेला घास तुडतूड्याने हिसकावून घेतल्याने शेतकºयांचे अश्रू अनावर झाले आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी भंडारा जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. शेतकरी राजाही सुखावला. धान पिकाचे उत्पादन चांगलं होईल अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र सिल्ली परिसरात सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात धानाला लोंब्या फुटत असतांनाभात पिकावर हिरवे, तपकिरी, तसेच पांढºया पाठीच्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून आला आणि हातातोंडाशी आलेल्या अन्नाचा घास हिरावल्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला असून दिवाळी कशी साजरी होणार? हा प्रश्न पडला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाºया शेतकºयांना नेहमी संकटाचा सामना करावा लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी नेहमी दुखी असतो. त्यासाठी शेतकºयांना विमाच्या माध्यमातून तरी सरकारने आर्थिक मदत करण्याची शेतकºयांची मागणी आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *