धान बांधणीसाठी मोजावे लागतात एकरी साडे तीन हजार

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : यंदा कीड व रोगांमुळे, तसेच धान कापणीच्यावेळी लष्करी अळीचा प्रादूर्भाव वाढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच मोफतच्या शासकीय योजनांमुळे धान कापणी, बांधणी व मळणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहे. शिवाय दरात वाढ झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. धान बांधणीसाठी सध्या प्रति एकर धान बांधणीसाठी मजुरांना ३,००० ते ३,५०० रुपये मोजावे लागत आहेत. जिल्ह्यात सद्य:स्थितीत धान कापणीसाठी महिला मजुरांना २०० ते २५० रुपये मोजावे लागत आहेत, तर बांधणीसाठी पुरुषांकडून प्रतिदिन ४५० ते ५०० रुपये मजुरी घेतली जात आहेत. मागील काही वर्षांपासून धान बांधणीसाठी हुंडा पद्धती वाढली आहे. कापणीसाठी २५०० ते ३००० हजार रुपये प्रति एकरचा दर मजुरांकडून घेतला जात आहे. यावर्षी उत्पादन कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती आहे. शेती व्यवसाय आता अधिकच कठीण होऊन बसला आहे. अवाढव्य दरवाढ झाल्याने शेती करणे शेतकºयांना कठीण होत आहे. खते आणि आणि कीटकनाशके महागली आहेत.

परिणामी प्रति एकर लागवडीचा खर्चही वाढलेला आहे. शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, पाइप, मोटारपंप, विद्युत बिल, त्याचप्रमाणे शेतकºयांपुढे मोठी समस्या मजुरांची आहे. शेतीच्या कामासाठी शोधूनही मजूर मिळत नाहीत. मजूर मिळाल्यास त्याच्या मजीर्नुसार मजुरी द्यावी लागत आहे. आता यांत्रिकीकरणामुळे थोडेसे सोपे झाले असले, तरी विविध उपकरणांच्या वाढत्या किमती, त्यांना लागणाºया इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत धान कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. खर्चाच्या तुलनेत हमीभाव परवडेना यंदा धानाला हमीभाव अ ग्रेडसाठी २,३२० रुपये, तर ब ग्रेडसाठी २३०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला आहे. मागील पाच वर्षांत धानाचा हमीभाव फारसा वाढलेला नाही. तुलनेत इंधन, कीटकनाशके आणि शेती अवजारांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आधुनिक यंत्रामुळे पारंपरिक शेती व्यवसाय लोप पावला आहे. त्यातच दरवर्षी शेतकºयांना बारदाणा खरेदी करताना विनाकारण जास्त पैसे मोजावे लागतात.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *