बैलगाडीवर बसून उमेदवारी दाखल करण्यासाठी पोहोचले नाना पटोले!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २० नोव्हेंबरला निवडणुका होणार असून २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले. उमेदवारी दाखल केल्यानंतर ते म्हणाले, येथील लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. विरोधकांना जनता प्रत्युत्तर देईल.

महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार शेतकरी, गरीब, महिला आणि आरक्षणाच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन निश्चित आहे. शेतकºयांचे कर्ज माफ करू. महिलांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. तरुणांनारोजगार देणे आणि महागाई कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया साईटवर लिहिले की, नागरिक सहभागी झाले आहेत. शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा जपण्यासाठी मी आणि महाविकास आघाडी कटिबद्ध आहोत, चला लढूया, महाराष्ट्र घडवूया.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *