तुमसर : तुमसर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडी राष्टÑवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार चरण वाघमारे यांनी नामांकनाच्या शेवटच्या दिवशी दि.२९ आॅक्टोंबर रोजी त्यांच्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तुमसर येथील चरण वाघमारे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून काढण्यात आलेल्या रॅलीत तुमसरमोहाडी विधानसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्त्यांनी सहभागी झाले होते. याशिवाय प्रचंड नारेबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात तहसील कार्यालयापर्यंत रॅलीत नेण्यात आली.
मी आमदार असतांना विधानसभा क्षेत्रातील तुमसर व मोहाडी तालुक्यातील गावांमध्ये अनेक विकासकामे केली आहे. मात्र मागील पाच वर्षात येथील जनता पोरकी झाल्याचे चित्र दिसुन येत आहे. त्यामुळे यावेळी जनताजनार्दन नक्कीच मला आशीर्वाद देतील असा आशावाद चरण वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजीत व ढोल ताशाच्या गजरात त्यांना प्रोत्साहित केले. चरणभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है, असा एकच जल्लोष रॅलीत होता. नामांकन भरतांना माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार चरणभाऊ वाघमारे यांचेसोबत माजी पं.स.सभापती हरिश्चंद्र बंधाटे ,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बाजार समिती संचालक बाजार राजेश पटले, जि.प. सभापती राजेश सेलोकर, शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक सुधाकर कारेमोरे, उमेदवार प्रतिनिधी बालचंद पाटील उपस्थित होते.