साकोली : आज २९ आॅक्टोबरला विधानसभा निवडणूकिसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी साकोली विधानसभा क्षेत्रासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाºयांसह हजारोच्या संख्येत काँग्रेस व महाविकास आघाडी पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच भाजपाचे उमेदवार अविनाश ब्राम्हणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत आ.डाँ.परिणय फुके, बीड- ीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे,माजी खा. सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, , व महायुतीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. अपक्ष भाजपा नेते डाँ.सोमदत्त करंजेकर यांनीही माजी आम.राजेश काशिवार व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला नामांकन अर्ज दाखल केला. तिन्ही उमेदवारांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत नामांकन दाखल केला. शेवटच्या २९ तारखेपर्यंत एकूण ५६ उमेदवारांनी १०७ अर्ज खरेदी केलेत.तर शेवटच्या तारखेपर्यंत २२ उमेदवारांकडून ३१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहे.