भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तुमचा विश्वास आणि पाठबळ हीच माझी काम करण्याची ऊर्जा आहे. याच जोरावर मी मतदार संघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकलो. आपल्या सर्वांचा आशीर्वाद पुन्हा पाठीशी असू द्या, विकास गंगेचा प्रवाह असाच येत राहील, अशा शब्दात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत मतदारांना आश्वासित केले. हजारो जनसमुदायाच्या साक्षीने आमदार भोंडेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. भंडारा विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून नरेंद्र भोंडेकर यांना शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र भोंडेकर यांनी हजारो समर्थकांच्या साक्षीने आणि आशीवार्दाने आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी आ. भोंडेकर यांच्या पत्नी डॉ. अश्विनी भोंडेकर उपस्थित होत्या, त्यापूर्वी येथील किसनलाल सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देत दाखविलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे आभार मानले आणि गेल्या पांच वर्षात केलेले विकास कार्य ही अविरत सुरू ठेवून भंडाºयाला सर्वांच्या स्वाभिमानचा बनवायचा असल्याची ग्वाही दिली. आता जल पर्यटन सारखे प्रकल्प भंडाºयाला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणार असुन असे एक नाही तर तब्बल ३३ प्रकल्प जिल्ह्यात राबविल्या जात आहे ज्यामुळे जिल्ह्यातील १० हजारापेक्षा आधिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. महायुतीच्या शासन काळात भंडारा विधानसभा मतदारसंघाचा सर्वाथार्ने विकास साधण्याचा प्रयत्न केला. आपल्या पाठबळामुळे हे शक्य झाले. अजूनही बºयाच सकारात्मक गोष्टी मतदारसंघात घडवून आणावयाचे आहेत.
यासाठी आपले आशीर्वाद पुन्हा एकदा भावाच्या पाठीशी असू द्या, असेही ते म्हणाले. सभेला शिव सेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर, युवा सेना लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी, उपजिल्हा प्रमुख विजय काटेखाए, महिला जिल्हा संगठक सविता तुरकर, माजी महिला संगठक आशा गायधने, प्रकाश मालगावे, परमात्मा एक सेवक मंडळाचे वैरागडे गुरुजी, योगेश तुरकर, मोरेश्वर सार्वे, तेली समाज कमेटी चे अध्यक्ष बाबूजी सेलोकर, सचिव अशोक निमकर, भाजप चे अनू. जाती. मोर्चा चे प्रदेश सचिव राजकुमार गाजभीये, लोकसभा जिल्हा समन्वयक नितीन कडव, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ उल्हास फडके, जिल्हा उपाध्यक्ष चैतन्य उमाळकर, जिल्हा मुख्यालय प्रभारी व उपाध्यक्ष डॉ हेमंत देशमुख, जिल्हा प्रशिक्षण प्रमुख नितीन कारेमोरे, प्रदेश सचिव अबिद सिद्दिकी, प्रदेश कार्यकारिणी सदस्या मंजिरी पनवेलकर, माला बगमारे, विजया नंदुरकर, माजी राज्य मंत्री नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सरिता मदनकर, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष यशवंत सोनकुसरे,नरेंद्र झंझाड, शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर, तालुका अध्यक्ष विजय सवरबांधे, शहर अध्यक्ष हरिष तलमले व समस्त पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.