उमेदवारी अर्ज मागे घेणारे आकाश दुर्गे यांचे नरेंद्र भोंडेकर यांना समर्थन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: उबाठा गटाचे अपक्ष उमेदवार आकाश उर्फ धनराज दुर्गे यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आमदार नरेंद्र भोंडेकर यांना समर्थन जाहिर केले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने आपण भोंडेकर यांना समर्थन देत असल्याचे दुर्गे यांनी यावेळी सांगीतले. आपण मागील मागील पंधरा वर्षापासून शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत उबाठा पक्षाकडून मी स्वत:, माजी जि.प.उपाध्यक्ष दीपक गजभये व चंदू उके असे तीन लोकांनी उबाठाकडे उमेदवारीची मागणी केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. येत्या २-३ दिवसात आपण शिवसेना शिेंदे गटात प्रवेश करणार असल्याचे आकाश उर्फ धनराज दुर्गे यांनी सांगीतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *