भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगांव (देवी)च्या वतीने गणेशोत्सव २०२४ साजरा करण्यात आला. दहावी, बारावीत शिक्षण घेत असणाºया मोहगाव देवी येथील विद्यार्थ्यांच्या मनात,२३ वर्षांपूर्वी गणरायाची स्थापना करण्याची कल्पना आली. हनुमान व्यायामशाळेला’सूरगंगा’असे नाव दिले होते. गणरायाच्या स्थापनेनंतर हनुमान व्यायामशाळा असे नामांतर करण्यात आले. २३ वर्षांपासून समाजाभिमुख आजही उपक्रम गणेशोत्सवादरम्यान राबवले जातात. प्रत्येक वर्षी सामाजिक विषयावर देखावा निर्माण केला जाते. यावर्षी’खेडेगाव हे स्वयंपूर्ण गाव’ही संकल्पना राबविण्यात आली. २०२३ मध्ये या मंडळाला जिल्ह्याचा प्रथम प्राप्त झाला होता. क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या गावातील विद्यार्थ्यांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो.
मंडळाचे कार्यकर्ते गरजूंना कधीही मदत व रक्तदानासाठी तत्पर असतात. यावर्षी मंडळाची कार्यकारिणी अध्यक्ष महेश लेंडे, उपाध्यक्ष महेश राखडे, सचिव राहुल चकोले, मार्गदर्शक प्रकाश काळे, रामकृष्ण चकोले, बाबू दिपटे, सदस्य अविनाश साठवणे, सुनील बावनकर, शैलेश वाडीभस्मे, राजू वाडीभस्मे, मुकेश साठवणे, भरत लांबट, निखिल काळे, नरेश ठवकर, मोहित बुरडे, रमेश तलमले, यश लेंडे, चेतन चकोले, तुषार साठवणे, रोशन माकडे, नीरज वाडीभस्मे, विशाल वाडीभस्मे, अतुल साखरवाडे यांच्या नेतृत्वाखाली आभार कार्यक्रम शनिवार दि.२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १ वाजता फक्त १ तासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक भंडारापत्रिकाचे यशवंत थोटे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून वसंता चोपकर, उपाध्यक्ष महेश राखडे, तरासा भोंगाडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी गणेशफोटोचे पूजन करून दिप प्रज्वलित करून महाराष्ट्र गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगांव (देवी) च्या वतीने खेडेगांव हे स्वयंपूर्ण गांव या सामाजिक विषयावर व सांस्कृतिक व शारिरीक स्पधेर्चे व इतर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊन गणेश उत्सव स्पर्धेत सहभाग घेण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ मध्ये जिल्हातून प्रथम पुरस्कार व राज्यातुन ५ वा क्रमांक २५ हजार रुपये, एबीपी माझा मराठी वृत्तवाहिनीकडून उत्कृष्ट संदेश देणारे मंडळ म्हणून विदभार्तून प्रथम पुरस्कार. करंजेकर संस्था साकोली व देशोन्नती वर्तमानपत्र यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्कृष्ट देखावा २०२४सन्मानित पुरस्कार ५ हजार रुपये. पोलीस विभागामार्फत जिल्हातील सन २०२४ मधील जिल्हातील उत्कृष्ट मंडळ म्हणून मंडळाला प्रशस्तीपत्र देवून सत्कार. हे सर्व पुरस्कार मिळविण्यासाठी सभासदाचा व मंडळाला नेहमीच सहकार्य करणाºयाचा सुध्दा फार मोठा मोलाचा, सिहांचा वाटा आहे. त्यासाठी आभार मानण्यासाठी तसेच पुरस्कार प्राप्त रक्कम ३० हजार रुपये व होणारा खर्च व्यायाम शाळेत सुविधा करणे (संबल,रॅक व इतर) ३ हजार रुपये, आठ झाडाची कटरे ८ हजार रुपये, सन्मान कार्यक्रम नास्ता भेट ७ हजार ५०० रुपये, प्रवास खर्चबक्षीस (मुंबई,साकोली,भंडारा) ३ हजार ५०० रुपये, खेळाचे मैदान व गार्डन करणे (जाली, लाईट) ६ हजार रुपये, खेळाचे साहीत्य (बॅडमीटन,हॉली बॉल) २ हजार रुपये असे एकूण ३० हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती उपस्थितांना प्रास्ताविकातुन मार्गदर्शक प्रकाश काळे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी मोहंगावदेवी गावातून इयत्ता १० वीमध्ये कु.स्नेहा सुरेश चकोले हिने ८७.६० टक्के तर इयत्ता १२ वीमध्ये पियुष विजय लेंडे ८३ टक्के प्राप्त केल्याबद्द्ल सत्कार करण्यात आला. अनाथ वयोवृद्ध ६९ वर्षीय कौशल बुरडे यांच्या निवासस्थानी जाऊन तर आई-वडील नसलेली अनाथ कु.शिवानी नितीन साठवणे हिला चंद्रशेखर साखरवाडे यांनी रोख दोनशे रुपये, दैनिक भंडारापत्रिकाच्या वतीने यशवंत उदारामजी थोटे यांनी रोख पाचशे रुपये तर अथर्व बिमा सेवा व छकउ प्रीमियम संकलन केंद्र मोहगावदेवीकडून शालेय उपयोगी भेटवस्तु जाहीर कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.
यावेळी आशावर्कर मनिषा विरु बंसोड, प्रतिभा साखरवाडे यांनी भविष्यात मंडळाला जे काही सहकार्य लागेल त्याकरिता मदतीसाठी पुढे येणार असल्याचे मत व्यक्त केले. नेहमी मंडळाला सहकार्य करणारे मूलचंद आंबीलकर, श्रीहरी पडोळे, रामकृष्ण चकोले, सुरेश चकोले, सुधीर रामटेके, दुर्गा चकोले, स्वाती लेंडे, सविता आंबीलकर, मंदा साखरवाडे, पल्लवी काळे, विद्या बाळबुधे, प्रिया नितीन साखरवाडे, वेदु राजकुमार भांडारकर, मालती शिवशंकर लांबट, सत्यफुला राजेश लेंडे, दिपाली नितीन शेंडे, ऊर्मिला लेंडे, रुपाली बालपांडे, विश्वनाथ मेहर यांना दिवाळीनिमित्ताने अथर्व बिमा सेवा व छकउ प्रीमियम संकलन केंद्र मोहगावदेवीकडून प्रत्येकी दोन पणत्या,पेन व हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळकडून प्रत्येकी सात बुंदीचे लाडू डबा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश काळे, गोपाल मडामे, अमोल लेंडे, अमित डोकरीमारे, हरिदास चकोले, नरेंद्र चकोले, विजय मुळे, वृषभ साखरवाडे, श्रीकांत साठवणे, अमित लेंडे, प्रविण लेंडे, नरेंद्र निमकर, दिनकर बाळबुधे, निलेश काळे, आयुष बावनकर, रामा लांजेवार, शिवम लेंडे यांनी सहकार्य केले. व्यासपिठावरील प्रमुख अतिथीना हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगांव (देवी) च्या वतीने दैनिक लोकमतचे दिवाळी अंक सप्रेम भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार मुकेश साठवणे यांनी मानले.