भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : – दिवाळीच्या प्रकाशपर्वात नागरिकांच्या घरासोबत त्यांचे आयुश्य देखील प्रकाशमान व्हावे यासाठी महा- वितरणतर्फ़े राबविण्यात आलेल्या ‘हर घर दिया, हर घर दिवाली’ या संकल्पने अंतर्गत विदर्भातील तब्बल ६,२५० ग्राहकांना नवीन वीज जोडणी देत त्यांचे आयुष्य प्रकाशमय केले आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहीमेत विदर्भातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ६,२५० ग्राहकांना नवीन वीज जोडणी देत त्यांची दिवाळी गोड केली आहे. यात सर्वाधिक नागपूर जिल्ह्यातील १,२६८, बुलढाणा जिल्ह्यातील १,२१४ तर त्याखालोखाल गडचिरोली जिल्ह्यातील ७०४, अमरावती जिल्ह्यातील ६७३, अकोला जिल्ह्यातील ५४८, चंद्रपूर जिल्ह्यातील ५२५, वाशिम जिल्ह्यातील ३३७, यवतमाळ जिल्ह्यातील ३२६, भंडारा जिल्ह्यातील २६६, वर्धा जिल्ह्यातील २१९ तर गोंदिया जिल्ह्यातील १८१ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली. यात पायाभुत सुविधा उपलब्ध नसलेल्या २४८ ग्राहकांकडे त्या सुविधा उपलब्ध करून देत तर पायाभुत सुविधा उपलब्ध असलेल्या ६,००२ ग्राहकांना वीज जोडणी देत त्यांना प्रकाश देण्याचे महत्वपुर्ण काम महावितरणने अवघ्या १० दिवसात केले आहे.
महावितरणकडे नवीन वीजजोडणीचे अर्ज करुन आवश्यक शुल्काचा भरणा केलेल्या ग्राहकांची दिवाळी प्रकाशमय व्हावी, त्यांना अंधारात राहावे लागू नये यासाठी प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी २५ आॅक्टोंबर रोजी मांडलेल्या ‘हर घर दिया, हर घर दिवाली’ या संकल्पनेला अनुकुल प्रतिसाद देत २५ आॅक्टोंबर पासून राबविण्यात आलेल्या या संकल्पनेला मुर्त स्वरुप देण्यासाठी विदर्भातील सर्व अभियंत्यांनी विशेष परिश्रम घेत, ज्या ग्राहकांकडे वीज जोडणीसाठी आवश्यक असलेल्या पायाभुत सुविधा उपलब्ध नाहीत अश्या ग्राहकांकडे त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या यात सर्वाधिक ४० वीज जोडण्या खामगाव विभागात तर नागपूर येथील सिव्हील लाईन्स विभागाने ३० ग्राहकांकडे पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देत तेथे नवीन वीज जोडणी उपलब्ध करुन दिली. अकोला ग्रामीण विभागाने सर्वाधिक तब्बल ३५९ विज जोडण्या दिल्या, वाशिम विभागाने ३३७, कॉग्रेसनगर विभागाने २५३ तर बुटीबोरी विभागाने २४८ नवीन वीज जोडण्या दिल्या. या ६,२५० नवीन वीज जोडण्यांमध्ये ५,४७९ घरगुती, ५९३ वाणिज्यीक, ६२ औद्योगिक तर १३६ इतर वर्गवारीती अ ग्राहकांचा समावेश असून नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करुन आवश्यक शुल्का भरणा केलेल्या प्रत्येक ग्राहकाला त्वरीत वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यास महावितरण कटिबद्ध असल्याने महावितरणतर्फ़े स्पष्ट करण्यात आले आहे.