रेल्वेच्या धडकेत अपंग शिक्षकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : जुनी वस्ती तिरोडा येथील रहिवासी शिक्षक चक्रधर खोब्रागडे यांचा दिनांक ३ रोजी संध्याकाळी रेल्वेचे धडकेने मृत्यू झाला. पंचायत समिती तिरोडा अंतर्गत इंदोरा बुज. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत पदवीधर अपंग शिक्षक चक्रधर वामन खोब्रागडे ५५ वर्ष हे दिनांक ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान तिरोडा कवलेवाडा मार्गावरील रेल्वे गेट जवळ जात असतांना अचानक आलेल्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तिरोडा शिक्षण विभागात दु:खाची छाया पसरली असून गोंदिया रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांचे स्वाधीन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *