भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील मुंडीपार येथील जवान गितेश चौधरी कर्तव्य बजावत असताना १ नोव्हेंबर रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आज दिनांक ४ रोजी त्यांचे शव सैनिक विभागातर्फे आणण्यात आल्याने हजारोंच्या संख्येने लोकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली तालुक्यातील मुंडी फायदेशीर रहिवासी शहीद सैनिक गितेश देवरामजी चौधरी हे सैन्य दलात सिलिगुडी येथे सेवा बजावत असताना एक ३१ आॅक्टोबर रोजी रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना पश्चिम बंगाल येथील रुग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आल्याचा निरोप त्यांचे परिवाराला एक नोव्हेंबररोजी दुपारी मिळाला तर संध्याकाळी त्यांच्या मृत्यू झाल्याचा निरोप मिळाल्याने ऐन दिवाळीचे दिवशी मुंडीपार परिसरात शोककळा पसरली त्यांचे पार्थीव आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सैन्य दलातर्फे बीरसी फाटा येथे आणण्यात आले असता हजारो लोकांनी बीरशी फाटा येथे त्यांचे अंतिम दर्शन घेऊन माजी सैनिक समितीतर्फे बीरसी फाटा येथून भव्य रॅली काढून मुंडीपार येथील वैनगंगा नदी काठावर शासकीयईतमामात अंतिम संस्कार करण्यात आले .
याप्रसंगी जिल्हाधिकारी गोंदिया यांचे मार्फत उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण जिल्हा अधिकारी मानसी पाटील, गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्फत तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वनखडे, तिरोडा तहसीलदार मार्फत नायब तहसीलदार ए.पी .मोहनकर तसेच माजी सैनिक कल्याण समिती गोंदिया ,माजी सैनिक कल्याण समिती तिरोडा तर्फे पुष्प चक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच गोंदिया जिल्हा पोलीस विभागातर्फे बंदुकीच्या फैरी झाडून शोक सलामी देण्यात आली . या त्यांचे अंतिमयात्रेत हजारो लोकांनी सामील होऊन श्रद्धांजली अर्पण केली.