आॅपरेशन वॉश आऊट अंतर्गत २१ लाखाचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विधानसभा सार्वत्रीक निवडणुक संदर्भात भंडारा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात दि.३ नोव्हेंबर रोजी वॉश आऊट आॅपरेशन राबविण्यात आले.त्यामध्ये २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचे मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यात वॉश आऊट आॅपरेषन मोहीम राबविण्यात आली. विधानसभा सार्वत्रीक निवडणुकी च्या पार्ष्वभुमीवर मोठ्या प्रमाणात अवैध दारुच्या व्यवसाय होत असल्याने त्यावर अंकुश बसावा व निवडुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचीत प्रसंग ओढवु नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्र निर्माण होवू नये.

याकरीता पूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर्वत्र शांतता राहावी व कोणतेही घातपाती कृत्य / अप्रिय घटना घडू नये याकरीता जिल्हयात सदरचे वॉश आऊट आॅपरेशन यशस्वीरित्या राबविण्यात आले. वॉश आऊट आॅपरेशन दरम्यान जिल्हयातील १७ पोलीस स्टेशनचे प्रभारी व दुय्यम अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सदर आॅपरेश न दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात दारुबंदी काद्यन्वये २६ आरोपींवर कार्यवाही करुन २६ गुन्हे दाखल करुन २१ लाख ३१ हजार ३९५ रूपयांची ११,९८६.८६6 लिटर दारु जप्त करण्यात आली. जिल्हा पोलीस अधिक्षक नूरुल हसन यांनी भंडारा जिल्हयातुन अवैध धंद्याचा, अमली पदार्थाचा समुळ नाष करणेकरीता भंडारा जिल्हा वासीयांना आव्हान केले आहे की, नागरीकांनी अवैध धंदे करणारे, अमली पदार्थ सेवन करणारे, बाळगणारे, विक्री करणारे यांचे विरुध्द भंडारा जिल्हा पोलीसांना माहिती द्यावी. माहिती देणाºयांचे नाव भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे गुप्त ठेवण्यात येईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *