भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : २० नोव्हेंबर २०२४ रोजी होऊ घातलेल्या तुमसर मोहाडी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार चरण वाघमारे यांनी मोहाडी तालुक्यांतील जागृत देवस्थान गायमुख इथून आज दि.५ नोव्हेंबर रोजी प्रचाराचा नारळ फोडला . याप्रसंगी महादेवाचे भक्तिभावे पूजन करून निवडणूकीत विजयाचा आशीर्वाद मागितला.
आजच्या प्रचार दौºयात चरण वाघमारे यांनी गायमुख,लोहारा, सोरणा, लंजेरा,गोवारीटोला/पिटेसुर,रोंघा,लवादा,लेंडे झरी,आलेसुर,चिखली/आंबाटोला,देवनारा,ड ोंगरी,बाळापुर,कुरमुडा,मोठागांव,आसलपाणी ,ससुरडोह,गर्रा/हेटी,बघेडा,पवनारा,आंबागड ,रामपुर,बपेरा या इत्यादी गावांत प्रचार करीत आपण आमदार असतांना केलेल्या विकास कामांची आठवण करून देत मागील पाच वर्षात तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघात विकास खुंटला असुन विकासाची गंगा आणायची असल्यास योग्य उमेदवार निवडुन देण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी महाविकास आघाडीतील घटकपक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, विकास फाउंडेशन तसेच इतर सहकारी मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व चरण वाघमारे यांचे हितचिंतक व मित्र मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते