भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: देशाच्या विकासाचा मार्ग गावातून जातो. गाव समृद्ध झाल्यास राज्य आणि देश विकसित होतो. ग्रामीण भागापर्यंत विकासाची गंगा प्रवाहित ठेवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी उभे रहा आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या आशीर्वाद धनुष्यबाणाला द्या, असे आवाहन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. आज महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा करीत ग्रामस्थांच्या भेटीत घेतल्या. खैरी, कोथू र्णा, टाकळी, खमाटा, लावेश्वर, इंदूरखा, दाभा, सोनुली, सिल्ली, केसलवाडा, खोकरला, टवेपार, खुरशीपार, मोहदुरा, हत्तीरोई अशा अनेक गावांमध्ये जात नरेंद्र भोंडेकर यांनी महायुतीच्या शासन काळात राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
आज महिला सक्षम आहे, ती राज्य सरकारच्या कल्याणकारी प्रचार दौºयाला उत्स्फूर्त प्रतिसाद निर्णयांमुळे. लाडक्या बहिणी योजनेमुळे महिलांना आर्थिक सबल करण्याचे काम केले. युवक युवतींना मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून हाताला काम मिळेल या दृष्टीने प्रशिक्षण व सोबत मानधन देण्याचा निर्णय याच सरकारने घेतला असे सांगताना शहरी पासून ग्रामीण भागापर्यंत विकासगंगा प्रवाहित करण्याचे काम हे सरकार करीत आहे. भंडारा विधानसभा मतदारसंघातही अनेक विकासाची प्रकल्प आणून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रचार दौºया दरम्यान आमदारांचे ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आले. अनेक लहान सभांच्या माध्यमातून यावेळी आमदारांनी ग्रामस्थांना संबोधित केले. या दौºया दरम्यान त्यांनी नव मतदारांशीही संवाद साधला.