भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक विजय गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत निवडणूक निरीक्षकांनी उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण सूचना आणि मार्गदर्शन दिले. निवडणूक प्रक्रिया शांततामय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने सर्वांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
साकोली विधानसभा निवडणूक प्रक्रिया: सामान्य निरीक्षक श्री. गुप्ता यांनी केले उमेदवारांना मार्गदर्शन
