भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : २० नोव्हेंबर रोजी होणारे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा आदिवासी गोंड गोवारी समाजाने शासन स्तरावर निवेदन देऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने तिरोडा विधानसभा स्वीप नोडल अधिकारी यांनी कोडेलोहारा परिसरातील आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेऊन मतदान करावे यासाठी केलेल्या प्रयत्नाला अपयश आले असुन आदिवासी बांधवांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.
सुमारे २५ वर्षापासून आदिवासी गोंड गोवारी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणी करता सतत शासनाला निवेदन देऊन आंदोलने करूनही मागणी मान्य होत नसल्याने संपूर्ण राज्यात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आदिवासी गोंड गोवारी जमात संविधान हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य द्वारे घेण्यात येऊन हे निवेदन सर्व जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्यावरून आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी ६४ तिरोडा विधानसभा क्षेत्राचे गटशिक्षणाधिकारी तथा स्वीप अभियान नोडल अधिकारी विनोद चौधरी यांनी कोडेलोहारा गावाचे चीचटोला येथे मंडळ अधिकारी कुमारी एम बी रहांगडाले तलाठी कुमारी ए.ए. सूर्यवंशी ,बी एल ओ सविता मेश्राम, तनुजा गेडाम ,सरपंच रवींद्र भगत, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद साखरे, पोलीस पाटील फुलचंद टेकाम यांचे सह आदिवासी गोंड गोवारी समाजाचे गणेश राऊत, मोतीराम काळसर्पे, रुपलाल वाघाडे, भरत ठाकरे, संजय नेवारे, अमरीत राऊत, प्रवीण राऊत, रमेश वाघाडे, प्रदीप नेवारे, अनिल वघारे ,चरणदास शेंदरे, भैय्यालाल आबेडारे ,संतोष राऊत, नरेश वाघाडे, प्रदीप राऊत यांचे सह समाज बांधवांशी चर्चा करून त्यांना आपले राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार बजावावा याबाबत निवडणूक आयोगाचे धोरणाबाबत माहिती सांगून समाज बांधवांनी विधानसभा निवडणुकीत आपले मतदान करून आपली मागण्यांकरिता शासन स्तरावर प्रयत्न करावे असे सांगितले
मात्र उपस्थित आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांनी आम्ही मागील अंदाजे २५ वर्षापासून आमचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा म्हणून प्रयत्न करत असून १९९४ मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आंदोलनात चेंगराचेंगरी व गोळीबार झाल्याने आमचे ११४ समाज बांधव शहीद झाले मात्र आमचे सतत शासनाकडे निवेदन धरणे आंदोलन करूनही आम्हाला न्याय मिळत नव्हता २०१८ साली शासनाने आमचे म्हणणे मान्य करून एसटी प्रवर्गाचे काही लोकांना दाखले दिले मात्र या विरोधात हे प्रकरण न्यायालयात गेल्याने नुकताच न्यायालयाने निर्णय देऊन आमचा एसटी प्रवर्गात झालेला समावेश चुकीचा असल्याचे निर्णय दिल्याने आम्ही परत मुंबई येथे जवळपास राज्यातील दोन-तीन लक्ष समाज बांधवांनी २६ जानेवारी २४ ते ११ फेब्रु.२४ पर्यंत मुंबई येथे आमरण उपोषण व रस्ता रोको केल्याने शासनाने आमच्या मागण्यासंबंधी निर्णय घेऊ असे सांगितले मात्र अजून पर्यंत आम्हाला शासनातर्फे न्याय न मिळाल्याने आमचे संघटनेने घेतलेले निर्णयानुसार आम्ही शासन सर्व जिल्हास्तर ,तालुका स्तरावर निवेदन देऊन घेतलेला निर्णय आमचा एसटी प्रवर्गात समावेश होईपर्यंत मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत आमचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार कायम असल्याचे सांगितले.