मतदारांचे पाठबळ हेच विकासाचे गमक-आ.भोंडेकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: बळ पाठीशी नसेल, तर माणूस हतबल होतो. आपले मतरूपी बळ मला पाच वर्षात भंडारा विधानसभा मतदार संघात गतिमान विकास करण्यासाठी पोषक ठरले. तुम्ही या विकासाचे गमक आहात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचे आशीर्वाद मला नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देऊन जाते, असे मत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. भंडारा शहरात घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. करचखेडा, बेरोडी, मंडणगाव, बेळगाव, सारपेवाडा, इंजेवाडा, नावेगव, चंद्रपूर, डोमजरी, उसरागोंदि, पलाडी, दिघोरी, कावळेवाडा, चितापूर, गराडा, राजेगाव, पिंपालगाव, टेकेपार, खुरशीपार, कोकनागड, मालीपार, सिनगोरी या क्षेत्रात आयन त्यांचा प्रचार दौरा होता. निवडणूक जवळ येत असताना प्रचाराचा वेग वाढू लागला आहे. शक्य तेवढ्या मतदारांपर्यंत पोहोचून शासनाच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आज भंडारा शहरात हा प्रचाराचा झंज-ावात राबविला. क्षेत्रातील प्रत्येक भागात आणि प्रभागात जाऊन मतदारांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना पुन्हा आशीर्वाद मागितले. तरुण मतदार, लाडक्या बहिणी असलेल्या मतदार आणि सर्वसामान्य नागरिकांसोबत यावेळी आमदार भोंडेकरांनी मुक्तपणे संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. काही ठिकाणी छोटेखानी सभा घेत राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना आज कशाप्रकारे परिवर्तन घडवून आणत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. मनात इच्छा असली तरी मतदारांची साथ आणि आशीर्वाद असल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. ही साथ खंबीरपणे मागील पाच वर्ष माज्या पाठीशी होती. पुढेही असेच आशीर्वाद पाठीशी राहू द्या, असे आमदार भोंडेकर म्हणाले. अनेक ठिकाणी आमदारांचे औक्षण करण्यात आले. फटाके फोडून त्यांचे स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी नव मतदारांकडून आमदारांसोबत संवाद साधला गेला. या प्रचार दौºयात आमदार आबाल वृद्ध यांची आस्थेने चौकशी करताना दिसत होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *