भंडारा पत्रिका/ तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील पुणे-मुंबईत काम करणाºयांची संख्या फार मोठी आहे. दिवाळी होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. यंदा दिवाळीनिमित्त गावाकडे आलेल्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी आहे. अशा परिस्थितीत दिवाळीनिमित्त घरी जाण्यासाठी अनेकांनी आगाऊ तिकीट काढले होते. परंतु अनेकांनी परतीच्या प्रवासाचे तिकिटे घेतली नव्हती. त्यामुळे आता परत शहराकडे जातांना अनेक रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट बुक करणे खूप कठीण काम झाले आहे. दिवाळीच्या निमित्ताने गावी जाण्यासाठी अनेकजण ट्रेनमध्ये तिकीट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना गाड्यांमध्ये निश्चित जागा मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेकांना गावी जाण्यासाठी तत्काळ ट्रेनची तिकिटे काढावी लागत आहेत. तथापि, या क्षणी तत्काळ ट्रेनचे तिकीट बुक करणे सोपे काम नाही. जिल्ह्यातील तुमसर रोड, कोका, भंडारा रोड स्थानकात अनेक प्रवासी उद्याचे तत्काळ तिकिटे मिळविण्यासाठी रेल्वे काउंटरवर रांगा लावून उभे दिसत आहेत. दिवाळीनंतर लोकांना तातडीने प्रवासाचे नियोजन करावे लागत आहे आणि रेल्वेचे तिकीट बुक करावे लागत आहे.
तथापि, कन्फर्म केलेले तिकीट हे ट्रेनमधील जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते आणि येथे तत्काळ सुविधा लागू होते. ज्या लोकांना अचानक प्रवास करावा लागतो त्यांना लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने तत्काल व्यवस्था सुरू केली आहे. ट्रेनचे तत्काळ तिकीट बुकिंग प्रवासाच्या फक्त एक दिवस आधी बुक करण्यासाठी प्रवासी धडपडत आहेत. तरीही अनेकांना लांब रांगेत उभे राहूनही कन्फर्म ट्रेन तिकीट मिळत नाही. तत्काळ तिकिटांसाठी रोड रेल्वे स्थानकात खूप गर्दी पहावयास मिळते आहे. असे काही प्रवासी आयआरसीटीसीच्या तत्काळ तिकीट बुकिंग सेवेचा लाभही घेत आहेत. प्रवाशांना तत्काळ तिकिटे मिळवण्यासाठी खूप घाई करावी लागत आहे. अनेक लोक तत्काळ तिकिटांचे बुकिंग देखील चुकवत आहेत. या सणासुदीच्या दिवसांमध्ये आयआरसीटीसीची तत्काळ तिकीट सुविधा कामी येते. भारतीय रेल्वेची ही सुविधा अचानक प्रवास करताना कामी येते. तत्काळ तिकिटे एक दिवस अगोदर बुक करता येतात. वातानुकूलित क्लाससाठी तत्काळ बुकिंगची वेळ सकाळी १० आणि स्लीपर क्लाससाठी ११ वाजताची आहे.