तिरोडा : पोलीस स्टेशन तिरोडा येथे कार्यरत असलेले हवालदार चंद्रमणी रामटेके (४४) हे दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजताचे दरम्यान तिरोडा पोलीस स्टेशन येथे आपले कर्तव्य पार पाडून घरी गेले असता अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता ७ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजताच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांचेवर दुपारी गोंदिया येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे या आकस्मिक मृत्यूमुळे पोलीस विभागात शोककळा पसरली आहे.