भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : आज दिनांक ७ नोव्हेंबर रोजी तिरोडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांचे प्रचार सभे करता आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरदचंद्र पवार यांनी या सभेत जनतेची दिशाभूल करणारे महाआघाडीचे सरकार बदलून टाका असे उद्गार काढले. याप्रसंगी बोलताना त्यांनी केंद्रातील व राज्यातील सरकार शेतकरी कामगार, कामकरी व सामान्य जनतेची दिशाभूल करीत असून सर्वसाधारण यशस्वी झाली असून केवळ खोट्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करीत आहे. आम्ही सत्तेत असताना सर्वांकरता योग्य प्रकारे योजना राबवून शेतकरी व जनतेला न्याय मिळवून देत होतो, मात्र आताचे केंद्र व राज्याचे सरकार भ्रष्टाचाºयांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करीत असल्याने हे सरकार बदलून टाका व आमचे महाविकास आघाडीचे तिरोडा विधानसभेचे उमेदवार रविकांत बोपचे यांचे सह सर्वच उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केले. तर या सभेत आपले प्रास्ताविकात रविकांत बोपचे यांनी विद्यमान आमदार यांचे बंधू संचालक असलेले जागृती पतसंस्थेत सामान्य जनतेचे करोडो रुपये बुडवून अपहार केला.
हा परिसर वनसंपदेने नटला असून नागझिरा अभयारण्य प्रसिद्ध असले तरी या वनसंपदेचा विकास केल्यास शेकडो बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता होती, मात्र या दृष्टीने त्यांनी कुठलेही काम केले नाही, मात्र आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन निवडून दिल्यास शिक्षण आरोग्य व वनसंपदा विकासाचे काम करून मला मिळणारे मानधन मी माज्या मतदारसंघातील गरीब मुलांचे शिक्षणाकरता दान देईल असे सांगितले. याप्रसंगी मंचावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी खासदार खुशालचंद्र बोपचे, मधुकरजी कुकडे, विद्यमान खासदार प्रशांत पडोळे, गोपालदास अग्रवाल, दिलीप बनसोड, प्रकाश गजभिये, पंकज यादव, ओम प्रकाश पटले, वंदना काळे, रश्मी गौर, सतीश पेंदाम, अशोक अरोरा, चंदाबाई शर्मा, चेतना बोपचे आदी उपस्थित होते.