भंडारा : येथील राम मंदिर वार्डातील रहिवासी निखिल शरद गोंडनाले यांचे गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबरला अल्पशा आजाराने त्यांचे कलकत्ता येथे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ ला दुपारी २ वाजता राम मंदिर वार्डातील त्यांच्या राहत्या घरून निघून भंडारा येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते कलकत्ता येथे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मध्ये कार्यरत होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
निखिल गोंडनाले यांचे निधन
