भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पवनी शहरात महायुतीचे उमेदवार आणि भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना आदर्श आमदार असे उल्लेखित त्यांची विजयाची हॅटरीक घडवून आणायची विनंती त्यांनी केली आणि आयोजित प्रचार सभेत विरोधकांना चांगलेच फाईलावर घेतले. पवनी येथील संभाजी चुटे नाट्यगृहाच्या मैदानावर झालेल्या सभेला मुख्यमंत्री शिंदे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती, जेथे त्यांचे जनतेने जल्लोषात स्वागत केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे आभार व्यक्त करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षनेत्यांना ‘फुसका पटाका’ म्हणत त्यांनी टीका केली आणि आपले सरकार ही जनतेची सरकार असून जनहितासाठी ठोस पावले उचलत असल्याची ग्वाही दिली. लाडली बहीण योजनेचा संदर्भ माहिती देत शिंदे म्हणाले की, त्यांचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास या योजनेतील मदतीची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपयांपर्यंत वाढवणार आहे. शेतकºयांच्या हितासाठी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकºयांची वीज बिले माफ केली जातील आणि त्यांना ३० टक्के अनुदानही दिले जाईल. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कायार्चा गौरव करून त्यांनी आपल्या कार्यकाळात विधानसभा मतदा- रसंघातील भंडारा व पवनी शहरांना नवी दिशा दिली असून अनेक विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केल्याचे सांगितले.
विरोधकांवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधकांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाची तुलना केली पाहिजे. लाडली बेहन योजनेला विरोध करणाºया विरोधी पक्षांना धडा शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. विरोधी पक्ष नेहमी चांगल्या कामांना विरोध करतात, पण त्यांचे सरकार जनतेच्या हिताचे काम करते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनावर जनतेनेही समर्थनार्थ जय शिवाजीच्या घोषणा देत वातावरण अधिकच उत्साही केले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे भव्य पुष्पहार घालून स्वागत केले. सभेच्या ठिकाणी भोंडेकर समर्थक आणि शिवसैनिकांचा उत्साह पाहण्याजोगा होता, जो परिसरात महायुतीच्या वाढत्या ताकदीचे प्रतीक मानला जात आहे. या वेळी मंचावर शिवसेने चे जिल्हा प्रमुख अनिल गायधणे, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुरवे, शहर प्रमुख मनोज साकुरे, विजय काटेखाए, प्रशांत भुते, नामदेव सुरकर, बंडूभाऊ हटवर, देवराज बावनकर, किशोर पंचभाई, डॉ. अनिल धाकते, विकास सरोदे, राष्ट्रवादी कॉँग्रेस चे नरेंद्र झांजाड, हरिष तलमले, विजय सावरबंधे, मुकेश बावणकर, सैलेश मयूर, भाजप चे नितीन कढव, विकास मदनकर, मयूर बिसेन, महेंद्र निंबारते, बबलू आथिलकर,प्रमोद मेंढे उपस्थित होते.