मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये मतदान जनजागृती उपक्रम

मोहाडी : सार्वत्रिक निवडणुकामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती. तरीही मतदानाचा टक्का ७५ टक्क्यापेक्षा जास्त गेला नव्हता. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, एकच मागणे दिवाळी सणाला, मतदान नक्की करायचा निवडणुकीला आपल्या पोलीस कर्मचारीकडून नातेवाईकाकडून दिवाळीला अशी शुभेच्छा पत्रे, सोशल मीडियावरील डिजिटल पत्र आले, तर चकित होऊ नका. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शाळामध्ये दिवाळीच्या सुट्टीत पोलीस कर्मचारी मुलांकडून स्वीप कडून उपक्रम करवून घेतला जात आहे. त्यात भावी मतदार असलेले विद्याथीर्ही हिरीरीने सहभागी होत आहेत. आता होणाºया तुमसर-मोहाडी विधानसभा निवडणुकीत देखील अधिक मतदान व्हावे, यासाठी प्रशासन आता पासूनच कामाला लागले आहे. ‘स्वीप’कार्यक्रमा अंतर्गत यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत, त्यात आता पोलीसांचा अर्थात भावी मतदाराचाही उपयोग करून घेतला जात आहे. पंचायत समिती मोहाडी तर्फे स्वीप अंतर्गत पोलीस स्टेशन व नायरा पेट्रोलपंप मोहाडी येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि.८ नोव्हेंबर २०२४ ला दुपारी ४ वाजता करण्यात आले. यावेळी मतदारांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मतदानाचे महत्व, मतदान का करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *