तिरोडा येथील माजी आमदारांचे घरुन चोरट्यांनी केला साडे चार लाखांचा मुद्देमाल लंपास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार तथा तिरोडा येथील माजी आमदार दिलीप भाऊ बनसोड यांच्या घरातून सुना मोका पाहून अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केल्याची घटना घडली असून तिरोडा पोलीस या घटनेचा कसून शोध घेत आहेत. तिरोडा येथील माजी आमदार दिलीप बनसोड यांना मोरगाव अर्जुनी येथील काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली असल्याने ते आपले परिवारासह प्रचाराच्या कामात व्यस्त असताना गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या घरी कुणीही नासल्याचा मोका पाहून अज्ञात चोरट्यांनी भिंतीवरून उडी मारून घराचे लाकडी दाराचे कुरूप तोडून घरात प्रवेश करून त्यांचे बेडरूम मधील अलमारी तोडून दिड लक्ष रुपये रोख व दोन लक्ष सत्यानव हजार पाचशे रुपयाचे सोन्याचे दागिन्यावर हात साफ केला. त्यांचे चालक ओमप्रकाश बिसेन यांचे तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम ३३१ (४), ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर, पोलीस निरीक्षक अमित वनखडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळी गोंदिया येथून श्वान व फिंगरप्रिंट तज्ञांना बोलावले. यात श्वानांने काही अंतरावर जाऊन परत आल्यावरून अज्ञात चोरटे काही अंतर पायी जाऊन नंतर एखाद्या वाहनाने पसार झाले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित वनखडे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *