भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राज्यातील महायुतीचे सरकार विकासाची वाट मोकळे करणारे आहे. या सरकारचा एक घटक म्हणून जे प्रयत्न मी भंडारा विधानसभेच्या परिवर्तनासाठी केले, त्यात तुमचा वाटा सिंहाचा आहे. विकासाच्या पाठीशी असेच उभे राहून, नव्या बदलाचे साक्षीदार बना, असे मत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केले. भंडारा विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी आज भंडारा शहरातील विविध प्रभागात मतदारांच्या भेटी घेत प्रचार केला. यावेळी त्यांनी गृह भेटी घेताना लाडक्या बहिणींशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार तरुण आणि लाडक्या भावांशी बोलताना त्यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतात समाधान करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी चौक सभा घेण्यात आल्या. ही निवडणूक महाराष्ट्राला परिवर्तनाच्या दिशेने येणारी आहे. महाराष्ट्राचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक असा सर्वांगाने विकास साधण्याचे सामर्थ्य महायुतीच्या सरकारमध्ये आहे. हे सरकार गाव पातळीवरून शहरापर्यंत परिवर्तनाची वाट प्रशस्थ करणारे आहे. अशा सरकारचा एक घटक म्हणून आज मी तुमच्यासमोर आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. याच सरकारच्या काळात भंडारा विधानसभा मतदारसंघ अनेक विकासाचे प्रकल्प आणण्यात मी यशस्वी झालो. यात नक्कीच तुमचा मोलाचा वाटा आहे. हा विकासाचा प्रवाह अबाधित राहावयासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद द्या असे उदगार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. प्रचार दौºया दरम्यान शहरातील विविध प्रभागात वाजतगाजत रॅली काढण्यात आली होती. लाडक्या बहिणीसह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बदलत्या नव विकासाचे साक्षीदार व्हा- आ. भोंडेकर
