आदिवासी गोवारी जमातीच्या मतदानावर बहिष्कार नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आदिवासी गोंड गोवारी संघटनेची गोवारी समाज बांधव व माताभगिनी यांचा मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे वृत्तपत्रात जाहीर केले होते. या निर्णयाच्या आदिवासी गोवारी जमातीशी काहीही संबंध नाही. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे त्यावर कोणीही गधा आणू शकत नाही. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी देशभर जनजागृती सुरु सुरू असताना आदिवासी गोंड गोवारी संघटनेला आमचा मूलभूत अधिकारांचे खेळण्याचा अधिकार नाही या बहिष्काराशी गोवारी जमातीच्या काहीहि संबंध नाही. त्यामुळे बहिष्कार बाबतीत कोणीही गोवारी बांधवांनी कोणत्याही प्रकारची धमकी देऊ नये. तसेच काही ठिकाणी मतदान केल्यास दंड आकारण्यात येईल असेही सांगण्यात आले असे आढळून आल्यास निवडणूक आयुक्तकडे तसेच पोलिसाकडे तक्रार करण्यात येईल. गोवारी बांधवांनी कोणालाही न घाबरतात मतदान करावे असे आवाहन गोंदिया आदिवासी गोवारी समाज संघटन गोंदिया जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेले आहे. दिनांक १० नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वागत लॉन येथे संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली.

या सभेत समाजातील नागरिकांच्या मुलभूत हक्कावर बहिष्काराच्या माध्यमातून आणलेला अडथाडा दूर करून त्यांना मतदान करण्याचा पूर्ण हक्क असून त्यांनी येत्या 20 तारखेला मोठ्या संखेने मतदान करण्याचे आवाहन सभेचे अध्यक्ष शालीकराम नेवारे यांनी केले. नेवारे हे आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्रचे मुख्य समन्वयक असून त्यांच्या अध्यक्षतेखाली हे निर्णय घेण्यात आले. याबाबत जिल्हा संघटनेच्या वतीने तसे ठराव सुद्धा घेवून जिल्ह्यातील सर्व सामाजिक बांधवांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष राधेश्याम कोहळे, शहर अध्यक्ष डी टी चौधरी, जिल्हा सहसंघटक ज्ञानेश्वर राऊत, पत्रकार प्रतिनिधी शेखर लसुन्ते, सदस्य प्रेमलाल शहारे, केशव कोहळे, मोहन शहारे, संजय कोहळे, ग्यानिराम बगळते, मदनलाल नेवारे, विनोद राऊत, मोहन शहारे, विवेक राऊत, गजानन पोंगळे, अरुण काळसर्पे, सी.बी. कावरे, बालचंदजी राऊत, नरेश भोयर, चंद्रभान चौधरी, खेमचंद राऊत, रामेश्वर चौधरी, दुर्गेश सहारे, चंदन सहारे, गोवर्धन सोनवाने, प्रताप नेवारे, रामाजी नेवारे, विजय शहारे आणि समस्त आदिवासी गोवारी समाज संघटना जिल्हा शाखा गोंदिया तसेच समाजील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *