भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दि. १३ नोव्हेंबर २०२४ विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनानुसार निवडणूक प्रक्रीया शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरीता आन दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलीस स्टेशन तुमसर अंतर्गत तुमसर शहरात भंडारा पोलीसांच्या वतीने राष्ट्रध्वज, पोलीस ध्वन व बैड पचक सह μलैग मार्च घेण्यात आला. सदर μलैग मार्च तुमसर पोलीस स्टेशन येथून सुरु होवुन बावनकर चौक, संताजी मंगल कार्यालय, तहसील कार्यालय, आंबेडकर चौक, कुंभारे नगर, नांगी चौक, सुभाषबाबु पुतळा, सराफा लाईन, जामा मस्जीद समोरुन बावनकर चौक येवून परत पोल्लौस स्टेशन तुमसर मेथे येवून समापन करण्यात आला.
सदर μलैग मार्च दरम्यान पोलीस वाहनांमधून आदर्श आचार संहीतेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत तसेच मतदान प्रक्रीया शांततेत पार पाडावी याकरीता जनतेस आवाहन करण्यात आले. सदर पलंग मार्च मध्ये डॉ. संजय कोलते जिल्हाधिकारी भंडारा, नुरुल हसन, पोलीस अधिक्षक भंडारा, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक भंडारा, पांडुरंग गोफणे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर तसेच २० पोलीस अधिकारी, ७५ पोलीस अंमलदार, आर.सी. पी. चे ०२ प्लाटून, एस.एस.बी कंपनीचे १५ जवान, आर.ए.सी. चे ६५ जवान, आ.पी.एफ. चे २५ जवान, फलेंग मार्च करीता हजर होते.