भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: भंडारा विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र यांच्या प्रचारार्थ आजोजित मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या रोडशो ने वेगळीच छाप पाडली. मराठीच्या अस्मितेसाठी लढणाºया तरुण नेतृत्वाला तिसºयांदा विजयी करून विधानसभेत पाठवा, अभिजय लाडक्या बहिणीच्या अस्मितेचा असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. निवडणुकीचा प्रचार आता हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. आज भंडारा महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या निवडणूक प्रचारासाठी अड्याळ, कोंडा, कोसरा, पहेला या पवनी तालुक्यातील गावांमध्ये मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या रोडशो चे आयोजन करण्यात आले होते. प्रचंड मोठ्या संख्येत असलेल्या लाडक्या बहिणींच्या साक्षीने हा रोड शो कारण्यात आला.
यावेळी उसगावकर यांच्या सोबत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनी याही उपस्थित होत्या. जय श्रीराम आणि नरेंद्र भाऊ आगे बढो च्या गगनभेदी घोषणांमध्ये निघालेल्या या रोडशो वर जेसीबी द्वारा पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी एकावाहनावर आमदार नरेंद्र भोंडेकर व महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रचंड मोठ्या जनसमुदायाच्या साक्षीने निघालेल्या या रोडशोमुळे वातावरण बदलून गेले होते. एक तरुण आमदार मतदार संघाच्या विकासासाठी धडपड करीत आहे. त्याच्या या प्रयत्नांना आपणा सर्वांची समर्थ अशी साथ हवी आहे. मराठी अस्मिता आणि मराठी बाणा जपण्यासाठी भोंडेकर यांना तिसºयांदा विजय करीत विधानसभेत पाठवा असे आवाहन यावेळी वर्षा उसगावकर यांनी केले. अभिनेत्रीला पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय रस्त्याच्या बाजूला एकत्रीत आला होता.