विकास नाकारण्याºयांना जनता नाकारेल : गायधने

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: कोट्यवधीचा निधी आणून, सुरू झालेली कामे दिसत असताना तो विकास नाही म्हणून, विकासाची चेष्टा करणाºयांना जनताच धडा शिकवेल, अशा शब्दात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या विकास कामावर शंका घेणाºयांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांनी प्रतिउत्तर दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक प्रचारात रंगत चढत असून वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयांवरून आरोप सुरू झाले आहेत. प्रत्येकाला प्रचारादरम्यान स्वत:ला सिद्ध करण्याचा अधिकार आहे. निवडणुकीत आरोप प्रत्यारोप हे सुद्धा नवीन नाहीत. मात्र चांगल्या कामाला, चांगले न म्हणता त्या संदर्भात विपरीत प्रचार करण्याचा प्रयत्न काही उमेदवारांकडून होत आहे. खरंतर जेवढी विकास कामे आणि निधी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी खेचून आणला तेवढा निधी कधीही या मतदारसंघात कुठल्याच आमदाराने आणला नाही. ४००० कोटीच्या घरात निधी खेचून आणून विधानसभा मतदारसंघाचे रूप पालटण्याचा प्रयत्न नरेंद्र भोंडेकर यांच्याकडून होत आहे.

जल पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भंडारा जिल्ह्याचे नाव पोहोचावे यासाठी त्यांची धडपड लपून राहिलेली नाही. शेकडो कोटीचा निधी या प्रकल्पासाठी त्यांनी शासनाकडून मंजूर करून घेतला. ज्या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे, त्या विकास कामाला नाकारणे म्हणजे लोकभावनेचा अपमान असल्याचे गायधने यांनी स्पष्ट केले आहेत. रस्ते, भूमिगत गटार योजना, पाणीपुरवठा योजना यातून आलेले बदल, नवीन सिंचन योजना हा विकास नाही का असा प्रति प्रश्नही त्यांनी केला आहे. आज विकास कामांविषयी बोलताना खोक्यांचा उल्लेख केला जातो. पण, कोट्यावधींच्या निधीरुपी खोक्यांमधूनच विकासाची कामे सुरू झाले आहेत. त्यामुळे खोकेबाज म्हणणाºयांनी याची जाणीव ठेवावी. आम्ही विकासाचे राजकारण करतो. डोळ्यात सलत असल्याने, आज तो विकास विरोधकांना स्वीकारण्यास त्रासदायक होत आहे. मात्र याच विकासाच्या जोरावर मतदार संघातील जनता पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासाला नाकारणाºया आणि खोक्याचे राजकारण करणाºयांना जनता उत्तर देणार, असेही ते म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *