भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बिरसी विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाºयाने आपल्याच बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे. राकेश भांडा- रकर (३०) असे आत्महत्या करणाºया पोलीस कर्मचाºयाचे नाव आहे. मृतक राकेश आज सकाळी १० वाजता कर्तव्यावर आला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्याची ड्युटी होती. मात्र सायंकाळी ४ वाजे दरम्यान राकेश भांडा- रकर याने स्वत:वर गोळी झाडली व यातच त्याचा मृत्यू झाला.