तुमसर मतदारसंघाच्या विकासाकरीता चरण वाघमारे यांना साथ द्या-जयंत पाटील

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : विधानसभा निवडणुकीत संपुर्ण महाराष्ट्रात मविआला मोठा प्रतिसाद मिळत असुन राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.आमचे सरकार तुमसर विधानसभा मतदार संघातील प्रश्न प्राधान्याने सोडविणार याची मी हमी देतो त्याकरीता तुमसर विधानसभा मतदार संघातील जनतेनी मविआ राकाँ शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार चरण वाघमारे यांना आशिर्वाद देवुन राज्याच्या विधिमंडळात पाठवावे असे आवाहन राकाँ शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. तुमसर विधानसभा मतदार संघाचे महाविआस आघाडी राकाँ शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार चरण वाघमारे यांच्या प्रचारार्थ दि.१६ नोव्हेंबर रोजी तुमसर येथे आयोजित प्रचार सभेत ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.

प्रचार सभेला मविआ चे उमेदवार चरण वाघमारे, खा.प्रशांत पडोळे,जि.प.उपाध्यक्ष संदिप टाले,धनंजय मोहकर,सिमाताई भुरे, जि.प. सभापती राजेश सेलोकर,पं.स.सभापती नंदु रहांगडाले तसेच महाविकास आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात मविआचे सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक गरिब घरातील महिलेला तीन हजार रुपए महिना यासह संपुर्ण एसटी बसचा प्रवास प्रष्ठी असणार आहे.शेतकठयांना ३० लाखांपर्यंतची कर्जमाफी देणार.सुशिक्षीत बेरोजगारांना दर महिन्याला ४ हजार रुपए बेरोजगारी भत्ता देणार व २५ लाखांपर्यंतचा मोफत उपचार मिळणार हा आमचा शब्द आहे.राज्यात महायुती सरकारने वंष्ठत्राटी पध्दतीने भरती प्रक्रिया राबवुन सुशिक्षीत बेरोजगार तरूणांचा अपमान चालविला आहे राज्याचे मविआचे सरकार आल्यास एमपीएससी मार्पष्ठत पदभरती राबवुन पारदर्शीपणे कारभार चालविला जाईल.राज्यात आमचे सरकार आल्यावर अडीच लाख नोकरभरती राबविणार असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगीतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *