गेल्या अडीच वर्षातील कामे तीच विकासाची ग्वाही : आ.भोंडेकर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गेल्या अडीच वर्षात भंडारा विधानसभे करीता मंजूर करण्यात आलेली विकास कामे हीच आमच्या विकसपूर्ण कालावधीची ग्वाही देतात की मी फक्त बोलतच नाही तर करून सुद्धा दाखवतो आणि मला पुढे पुन्हा अवसर मिळाला तर विकासाची गंगा अविरत वाहत ठेवण्याचे आश्वासन शिवसेना महायुती चे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी दिले. ते आज पवनी तालुक्यातील विविध गावात गावात आयोजित प्रचार सभेला संबोधित करीत होते. भंडारा पवनी विधानसभेचे महायुती चे उमेदवार आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचार दिवसेन दिवस जोर पकडतांना दिसत आहेत. याच शृंखलेत आज पवनी तालुक्यातिल आकोट, रुयाळ, सिंदपूरी व कोंढा या ठिकाणी झालेल्या सभेत क्षेत्रातील मतदार स्वयंस्फूर्ती ने उपस्थित राहिले. या दरम्यान आम. भोंडेकर लोकांना संबोधित करतांना म्हणाले की भंडारा विधानसभेच्या विकासा करीता या आधी अनेक आमदारांनी भाषणे दिली आणि विकासाच्या नावावर मते घेतली.

परंतु जिंकल्यावर सर्व भाषणे फक्त ऐकण्या पुरतीच राहिली परंतु आम्ही ती कामे केली ज्या भविष्यात भंडाºयाचे नाव जागतिक पातळीवर जाणारच सोबतच क्षेत्रातील लोकांना रोजगार सुद्धा मिळेल. ते म्हणाले की जेव्हा ते पहिल्यांदा आमदार झालेत तेव्हा त्यांना शिकायला पाच वर्षे लागलीत परंतु भंडारा पवनी क्षेत्राचा विकास करणे हा त्यांचा लक्ष होता. नशिबाने ते २०१४ च्या निवडणुकीत जिंकू शकले नाही आणि त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले परंतु २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी साथ दिली आणि माझे स्वप्न पूर्ण करण्याची संधि हाती लागली आणि त्या संधीच सोन केल. आज भंडारा येथे ३३ असे मोठे प्रोजेक्ट मंजूर झाले आहेत की पुढील काही काळातच भंडाºयाचा चेहरा मोहरच बदलणार आणि याचे नाव जागतिक पातळीवरजाणार आहे. आज विकासाच्या दिशेने वाटचाल करणारे सरकार म्हणून राज्यातील महायुती सरकारची ओळख निर्माण झाली आहे. ही प्रगतीची प्रक्रिया अखंडित राहावी, यासाठी महायुती शासन पुन्हा राज्यात येणे आवश्यक आहे. त्यामुळे भंडारा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला, म्हणजेच मला आपल्या खंबीर समर्थनाची गरज आहे, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *