भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पिंपरी : भारताचा पाया सनातन आहे आणि सनातवर प्रहार हा महाविनाशाला आमंत्रण आहे. कलतक बटे तो कटे थे, पर अब बटेंगे नही, तो कटेंगे भी नही, एक रहेंगे, सेफ रहेंगे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला साथ द्या, महेश लांडगे यांना निवडून द्या, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी येथे व्यक्त केले. भोसरीतील गावजत्रा मैदानावर भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना- एनसीपी- आरपी आय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी विक्रमी गदीर्ची जाहीर सभा झाली. भोसरीने आज भगवे वादळ अनुभवले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि सभेला सुरूवात झाली. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, निरीक्षक प्रदीपसिंह जडेजा, भाजपाचे शत्रुघ्न काटे, सुजाता पालांडे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, नितीन लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, मंगला कदम, ज्येष्ठ नेते वसंत लोंढे, हभप दत्तात्रय गायकवाड, राष्ट्रवादीच्या कविता आल्हाट, शिवसेनेचे संभाजी शिरसाट, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.