युवकाला अश्लिल शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील ग्राम मांडवी येथील एका ४० वर्षीय युवकाला तु पोलीसांना रेती चोरीची माहिती देवुन आमच्या गाड्या पकडण्यास मदत करतो असे बोलुन युवकाला अश्लिल शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार कारधा पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली आहे.याप्रकरणी कारधा पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.जागेश्वर मोतीराम बुजाडे वय ४० वर्षे रा.मांडवी त.जि.भंडारा असे पिडीत युवकाचे नाव आहे. तक्रारदार जागेश्वर बुजाडे हे मांडवी येथे राहत असुन त्यांची ग्राम ढिवरवाडा परिसरातील नदीलगत शेती आहे.ढिवरवाड रेतीघाटावरून मोठया प्रमाणात अवैध रेतीची चोरी करून वाहतुक केली जाते. घटनेच्या दिवशी तक्रारदार जागेवश्वर हे त्यांचा मित्र सुखेदव रेहपाडे यांच्यासह ढिवरवाडा येथील त्यांच्या शेतात पिकांची पाहणीकरीता गेले होते.दरम्यान ढिवरवाडा रेतीघाटात अवैधरित्या दोन ट्रॅक्टरमध्ये रेती भरणे सुरू असतांना भंडारा स्थागुशाचे पोलीस अधिकारी/ कर्मचारी हे मोटारसायकलने रेतीघाटावर येत असल्याची माहिती मिळताच रेती तस्करांनी तिथुन पळ काढला. मात्र स्थागुशाच्या पोलीसांनी त्या रेतीट्रॅक्टरचा पाठलाग केला.

हा सगळा प्रकार तक्रारकर्ते जागेश्वर बुजाडे व त्यांचा मित्र सुखदेव रेहपाडे यांनी बघीतला.थोड्या वेळाने जागेश्वर बुजाडे व त्यांचा मित्र हे गावाकडे परत येत असतांना मांडवी ग्रा.पं.चे सरपंच सहसराम कांबळे व अन्य एक साथीदार यांनी तक्रारदार बुजाडे यांची मोटासायकलला रस्त्यामध्ये अडवुन ‘ तु माझ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून त्याची माहिती पोलीसांना दिली असे बोलुनअश्लिल शिवीगाळ करून तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिली.दरम्यान पिडीत हे सायं.६ वाजेच्या दरम्यान स्वत:चे घरी असतांना गावातीलच भगवान बुराडे वय ३१ वर्षे याने पिडीतेच्या मोबाईलवर फोन करून त्याला गावातील चौकात बोलाविले व तिथे बुराडे व त्याचा अन्य एक साथीदार सचिन गोविंदा भुते वय २५ वर्षे यांनी संगनमत करून ‘ तु पोलीसांना माहिती देवुन आमचे रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडविण्याचे काम करतोस असे बोलुन अश्लिल शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारकर्ते जागेश्वर बुजाडे यांच्या तक्रारीवरून कारधा पोलीसांनी भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) नुसार कलम २९६,३५१ (२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *