सातबारा काढण्यासाठी जावे लागते नवेगावात

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील धुसाळा येथील तलाठी मागील सहा महिन्यांपासून कामावर रुजू नसून येथील स्थानिक शेतकºयांना, विद्यार्थ्यांना तलाठी संबंधीचे कागदपत्रे तयार करण्याकरिता कमालीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. धुसाळा हे गाव मोठे गाव असून इथे शेतकरी वर्ग आणि विद्यार्थी जास्त प्रमाणात आहे. सध्या स्थितीत सातबारा आॅनलाइन करण्यासाठी शेतकºयाची धडपड सुरू आहे. पण धुसाळ्यात स्थायी तलाठी नसल्याने येथील नागरिकांना नवेगाव येथील तलाठी कार्यालय गाठावा लागतो. परंतु तलाठी कार्यालय भरगच्च असल्याने शेतकºयांना एका सातबारा साठी सहा दिवस चकरा मारावा लागत आहे. तलाठी कार्यालयासमोर जवळपास शंभर ते दीडशे लोकांची रांग लागलेली असते. त्यामुळे शेतकºयांना आपले शेतीचे काम सोडून रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या शेतीचे काम जोमाने सुरू आहेत, पण शेतकरी मात्र सातबारा काढण्यात व्यस्त झाला आहे. त्यामुळे शेतकºयांचे शेतीचे कामे मागे पडताना दिसत आहेत. धुसाळा हे गाव तलाठी साजाक्रमांक चार मध्ये येत असून या साजा मध्ये नियुक्त तलाठी सध्या गायब स्थितीत आहेत. धुसाळा, घोरपड, बोंदरी, नवेगाव, काटी येथील शेतकरी व विद्यार्थ्यांना तलाठी नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.

ह्या साजामध्ये तलाठी उपस्थित का नाही असा प्रश्न गावकºयांनी उपस्थित केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून गावात तलाठी उपस्थित नसल्याने मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांनी “तलाठी शोधा आणि पाच हजाराचे बक्षीस जिंका”असा अजबच नारा दिला होता. धुसाळा येथील तलाठी उपस्थिती नसल्याने त्यांच्या पदभार नवेगाव येथील तलाठ्यांकडे दिला आहे. तलाठी कार्यालयाचे काम म्हटलं की, एकाच वेळेत काम पूर्ण होईल याची खात्री राहत नाही. गावात तलाठी नसल्याने येथील नागरिकांनी कितीतरी वेळा तक्रारी केले आहेत, एकदा मंडळ अधिकाºयांनी लेखी आश्वासित करून पंधरा दिवसाच्या आता कायमस्वरूपी तलाठी देऊ असे दिले होते. परंतु एवढे दिवस लोटूनही अजूनही तलाठी मिळालेला नाही. मागील स्थायी असलेल्या तलाठी बांते मॅडम यांना विचारले असल्यास ” मी ते पॉईंट सोडलेले आहे”असे ते बोलतात. तहसीलदारांमार्फत मात्र या विषयाकडे काहीही गांभीयार्ने घेतले जात नाहीत.असे स्पष्ट दिसून येत आहे. जर का येत्या दहा दिवसाच्या आत आमच्या गावाला तलाठी मिळाला नाही तर, आम्ही आंदोलन करू असे गावकरी बोलत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *