पांढराबोडी, काटी, धुसाळा, कांद्री मार्गावर नागरीकांचा जीवघेणा प्रवास

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी, काटी, धुसाळा, कांद्री हा रस्ता मुख्य रस्ता असून या रस्त्याचे मागील अनेक महिन्यापासुन बांधकाम सुरू आहे. मात्र या रस्त्याचे बांधकाम कासव गतीने होत असल्याने या रस्त्याने प्रवास करणाºया नागरीकांना आपला जीव मुठीत घेवुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासन नागरीकांचा जीव गेल्यावर रस्ता दुरूस्ती करणार का? असा प्रश्न नागरीक विचारीत आहेत. तालुक्यातील पांढराबोडी, काटी, धुसाळा, कांद्री हा रस्ता मुख्य रस्ता असून हा रस्ता सरळ जिल्ह्याशी जोडलेला आहे. येथील नागरिकांना कोणतेही सामाजिक किव्वा शासकीय कामे करायची झाल्यास त्यांना जिल्ह्याची धाव घ्यावी लागते. अशातच त्यांना याच रस्त्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याने जातेवेळी नागरिकांना कमालीचा त्रास सहन करून रस्ता गाठवा लागतो आहे. पर्यायी नागरिकांना दुसºया रस्त्याने जायचे झाल्यास दहा ते पंधरा कोलोमीटर फेºयाने जाऊन आपले कामे करावे लागते यामुळे नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ सुद्धा बसत आहेत. या रस्त्यासाठी नागरिकांनी सलग दोन वर्षांपासून प्रशासनाकडे तक्रार केल्याने अखेर थातुर-मातुर चे काम सुरू करून प्रशासन नागरिकां ना लॉलीपॉप देत आहे.

रस्त्याची दयनीय अवस्था होऊन रस्त्यावरून वाहने चालवणे तर सोडा पायी चालणे सुद्धा कठीण झाले आहे. या रस्त्यासाठी नागरिकांनी कितीतरी वेळा आंदोलने केली परंतु प्रशासनाला त्याचा काहीही फरक पडताना दिसत नाही. रस्त्याचे पूर्णत: तीन-तेरा वाजले असून सदर रस्त्यावर मागील चार महिन्यापासून गिट्टी पडून आहे पर्यायाने नागरिकांना प्रवास करते वेळी खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामध्ये दुचाकी ने प्रवास करणाºया नागरिकांना खडूयामुळे मणक्याच्या त्रास सुद्धा जाणवत आहे. रस्त्यावर गिट्टी पसरून मोठे जीव घेणे खड्डे पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सदर रस्त्याचे काम मंद गतीने सुरू होऊन फक्त दहा दिवसच करण्यात आले मात्र तेव्हापासून काम पूर्णपणे बंद पडला आहे. यासंदर्भात कित्येक तक्रारी केल्या परंतु प्रशासन लोकप्रतिनिधी हे कुंभकरणाच्या अवस्थेत झोपले असल्याचे दिसुन येते.दोन महिन्याआधी या रस्त्यावर मुरूम आणि गिट्टी टाकली गेली, परंतु आता गिट्टी, मुरूम उखाडल्याने वाहने चालवायचे तरी कुठून असा प्रश्न निर्माण होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *