नवेगावबांध जलाशयांवर परदेशी पाहुण्यांचा स्वच्छंद विहार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठे ९, तर मध्यम १८ आणि लघु ४२ सिंचन प्रकल्प आहेत. यापैकी जिल्ह्यातील काही जलाशय आणि तलाव परिसरात दरवर्षी हिवाळ्याला सुरुवात होताच विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते. विशेषत: युरोपीयन देश तसेच मंगोलिया, सायबेरिया परिसरातून विदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर महिन्यात दाखल होतात. जिल्ह्यातील तलाव व पक्ष्यांचे आवडते खाद्य येथे उपलब्ध असल्याने मोठ्या संख्येने विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. सध्यानोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून गोंदिया जिल्ह्यातील विविध जलाशयांवर विदेशी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचा क्रम मागील १५ ते वीस वर्षांपासून कायम आहेत. यात कसलाही बदल अथवा खंड पडलेला नाही. दरवर्षी या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पक्षी निरीक्षकांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *