भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आमगाव : कापणी करून मळणीसाठी शेतात ठेवलेल्या गंजीला अज्ञाताने आग लावल्याने शेतकºयाचे ७० हजार रुपयाचे नुकसान झाले. ही घटना तालुक्यातील माल्ही शिवारात उघडकीस आली. तालुक्यातील माल्ही येथील शेतकरी मिलिंदकुमार देवराव बिसेन यांनी त्यांच्या २ एकर शेतातील एचएमटी या धान वानाची कापणी करून मळणीसाठी गंजी करून ठेवले. दरम्यान अज्ञाताने गंजीला आग लावून बिसेन यांचे अंदाजे ७० हजार रुपयाचे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच तलाठी लाडे, पोलीस बिट जमादार उके यांनी मौकास्थळी पाहचून पहाणी केली.