मतदारांच्या मनातील संशय दुर होणे गरजेचे – चरण वाघमारे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघातील मतांची पुर्नमोजणी करण्याची मागणी करण्यात आली असुन निवडणुक विभागाकडे रितसर अर्ज करून नियमानुसार आवश्यक शुल्काचा भरणासुध्दा केला आहे.मात्र अद्यापही निवडणूक आयोगाने पुर्न मतमोजणीची तारीख निश्चित केली नसुन निवडणुक आयोगाने पुर्न मतमोजणी नाकारल्यास आपण न्यायालयाच्या माध्यमातुन इलेक्शन पीटिशन दाखल करून नागरिक/ मतदारांसमोर सत्य आणणार असल्याचे तुमसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी प्रसिध्दी पत्रकातुन कळविले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चरण वाघमारे यांनी राकॉं शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणुक लढविली आहे. निवडणुक निकालाच्या दिवशीच आपण सुचविलेल्या ५ व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी अर्ज केला होता मात्र तो निवडणुक निर्णय अधिकाºयांनी नाकारला. त्यामुळे विहित मुदतीत दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ ला माननिय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रीतसर अर्ज करून ५ ईव्हीएम आणि व्हीव्हींपॅट मशीनची पुर्नमोजनी करण्याची परवानगी आणि त्यापोटी आवश्यक शुल्काचा सुध्दा भरणा करण्यात आला मात्र निवडणुक विभागाकडून अजूनपर्यंत त्याचे उत्तर किंवा प्रत्यक्ष पुर्न मतमोजणीची तारीख कळविण्यात आलेली नाही. आपण जरी निवडणूकीचा निर्णय मान्य केला असला तरी मतदार संघातील सामान्य जनता/मतदार यांना या निकालाबाबत मोठया प्रमाणात संशय असुन मतदार/जनता प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष भेटून सांगत आपला संशय व्यक्त करीत असल्याने किमान त्यांच्या संशयाचे निराकरण करणे हे तुमसर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार म्हणून मी माझे कर्तव्य समजतो.

करीता निवडणूक आयोगाने पुर्न मतमोजणीची तारीख न दिल्यास संविधानिक आयुधांचा वापर करून न्यायालयात इलेक्शन पीटिशन दाखल करून नागरिक/मतदारांसमोर सत्य आणून त्यांच्या मनातील संशय दुर करणार असल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे. मागील काळात आर्टिकल ९ अ लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ नुसार तत्कालीन तुमसर च्या आमदारांनी शासनासोबत धान भरडाई चे कंत्राट घेतले असल्याने त्यासंबंधात केलेल्या तक्रारीवर दिनांक २० जुलै २०२१ रोजी मा. राज्यपाल महाराष्ट्र यांनी निवडणुक आयोगाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्यावरही अद्याप कार्यवाही झाली नसल्याने त्या प्रकरणात देखील न्यायालयात दाद मागणार आहोत. शासनाचे कायदे नियम सरपंचाला वेगळे आणि कायदे बनविणाºयांना वेगळे कसे असू शकतात. याची जनतेला जाणीव असून सरकारला त्याची आठवण काढून देण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून आपण न्याय मागणार असल्याचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *