भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : रात्रीच्या सुमारास लाखनी कडून भंडाराच्या दिशेने स्वगावी जात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बोरवेलच्या ट्रॅक ला धडक दिल्याची घटना गडेगाव/फाटा येथे घडली. सदर घटना (दि.७) डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील गडेगाव फाटा येथे राष्ट्रीय महामार्गांवर घडली. या घटनेत दुचाकीस्वार विश्वनाथ भोजराम कोकोडे (वय २१) यांचा दुदैर्वी मृत्यू झाला. तर प्रदीप कुंभरे (वय २१) हा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांत ट्रॅक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी घटनेतील मृतक आणि जखमी युवक दोन्ही युवक दुचाकीने काही कामानिमित्त लाखनी येथे आले होते. आपले काम आटोपून रात्रीच्या सुमारास ते स्वगावी गांगलवाडा येथे जाण्यास निघाले.
दरम्यान, वाटेत गाडेगाव फाटा येथे रस्त्याच्या कडेला के.ए.५१ एम. एच. ८८७९ क्रमांकाचा ट्रॅक गाडीचे चे लाईट बंद करून बोरवेल मशीन चा ट्रक आडव्या स्थितीत थांबाला होता. त्या थांबल्या ट्रॅक ला एम. एच. ३६ टी.२१५१ क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीस्वार एका तरुणाचा मृत्यू झाला.तर दुसरा इसम गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली असून, लाखनी पोलिसांनी घटनेचा पंचांनामा केला. आणि मृतादेह श्वाऊसाचदाणासाठी लाखनी श्वागारात पाठविले. फिर्यादीवरून आरोपी ट्रक चालक शंकर लक्ष्मण पाखमोडे (वय ४२) रा.मानेगाव यांचेविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे हे करीत आहेत.