भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- जवळच्या सावरी येथील मानवता हायस्कुल येथे सन १९९७ ला दहावीला असलेल्या माजी विद्यार्थी यांचे २७ डिसेंबर २०२४ ला स्नेहमिलन सेवानिवृत दिवंगत शिक्षकांना मानवंदना चे कार्यक्रम साजरा करण्यात आला. गजानन महाराज वंजारी मानवत्ता विद्यालय सावरी जवाहरनगर येथे १९९७ या वर्षात इयत्ता १० वा वर्ग पूर्ण करून २७ वर्षे लोटली. तरी पण आजही सोसल मिडियाच्या माध्यामाने वर्ग मित्र जोडली गेली असून एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होत असतात . या विद्यार्थ्यांनी वर्ग मित्रांचे स्नेहमिलन व विद्यालयातील सेवानिवृत दिवंगत शिक्षकांना मानवंदना हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. विशेष म्हणजे याच शाळेतील विद्यार्थी पुढील उच्च शिक्षण घेऊन सध्या जपान (टोक्यो), येथे नोकरीनिमित्त स्थायिक असलेले डॉ.देवेन्द्र मेश्राम यांचे पुढाकारातून या कार्यक्रमाचे.आयोजन करण्यात आले होते. जपान (टोक्यो), नागपुर, भंडारा व इतर शहरातून माजी विद्यार्थी उपस्थित होते.
माजी मुख्याध्यापक निर्वाण व सेवानिवृत प्रा. मलेवार मॅडम,सेवानिवृत्त प्रा. बर्वे सर यांचे उपस्थितीत या विद्यालयातील माजी शिक्षक दिगंवत प्रा. काकाजी रामटेके, प्रा. रमेश रामटेके , प्रा. निलकंठ येवले , प्रा. ढोबळे , प्रा. चौधरी यांना एक मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली देण्यात आली.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालय व आपल्या वर्ग खोल्यांचे अवलोकन करून जुन्या आठवणींना उजाळा देऊन भविष्यात आप्ल्या शाळेला जमेल त्या पद्धतीने मदत करण्याचे यावेळी आश्वासन दिले. कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, तसेच माजी विद्यार्थी नरेश चिंचुरकर, सुरजित निमजे, धनश्याम बहेरवानी, जगदिश बागडे, धनराज नेवारे, महेश मेश्राम, डॉ. देवेन्द्र मेश्राम, प्रतिमा रामेटेके, बबिता लोणारे, विना खोब्रागडे, जागेश्वर राखे, व इतर उपस्थित होते. संचालन ठवकर मॅडम व नरेश चिंचुरकर नी केला. तर आभार माजी सैनिक सुरजित निमजे नी केला.