भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा दोनला मंजुरी देऊन भंडारा जिल्ह्यातील ४९ गावांना सिंचनाची सोय करून देण्याबाबत आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून ४९ गावांना सिंचनाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्याला वरदान ठरलेली वैनगंगा नदी आणि त्यावर बांधलेला गोसेखुर्द प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील शेतीसाठी उपयुक्त आहे. परंतु भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यातील जवळपास ४९ गावे वैनगंगा नदीच्या काठापासून कमी अंतरावर असूनही सिंचनापासून वंचित आहेत.
त्यामुळे हजारो हेक्टर शेतीतून शेतकरी सिंचनाअभावी उत्पन्न काढू शकत नाही. त्यामुळे करचखेडा लिफ्ट धारगाव उपसासिंचन टप्पा दोनअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील दोडमाझरी, मोहाडी, पलाडी, चांदोरी, भिलेवाडा, माडगी, दिघोरी, आमगाव, उसरगोंदी, गांगोलावाडा, गराडा जंगली, सिंघोरी जंगली, मेंढा गराडा बू, पिपळवडा, कोकनागड, लाखनी, मुरमाडी, सावरी, मेंढा, सोमलवाडा, रेंगेपार कोठा, पिंपळगाव, आलेसुर, लखोरी, मासालमेटा, सींघोरी, गोंडसावरी, परसोडी साले भाटा, खेडेपार, चीचं टोला, टेकेपार हमेशा, सोमेवाडा, केसलवाडा पवार, केसलवाडा वाघ, वलमांझरी, खैरी, एकोडी, एकल एकोडी, चांदोरी, आतेगाव, पडस पाणी, मक्किटोला, निपरटोला, जामडी, मकरढोकळा, परसटोला, बोरगाव, गुढरी, सारथी, सरपेवाडा या गावांनाही सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. धारगाव उपसा सिंचन योजना टप्पा २, अंतर्गत प्रस्तावित उपसासिंचन मुळे एकूण ९००० हेक्टर शेत जमीनीला सिंचनाचा फायदा होईल, तसेच जे शेतकरी पाण्याअभावी किंवा सिंचनअभावी आपले पिकाचे उत्पन्न काढू शकत नाही अश्या शेतकºयांना नक्कीच या योजनेचा फायदा होणार असल्याकडे आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा विभागाकडे पत्र पाठवून पाठपुराव्याची ग्वाही दिली.