भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- मुरुमाने भरलेला टीप्पर मागे घेत असताना मागे असलेल्या दुचाकीस्वारास धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना निलागोंदी-जांभळी रस्त्यावरील गुढरी/फाटा येथे शनिवारी(ता.२८ डिसेंबर) रोजी सायंकाळी ४:०० वाजता दरम्यान घडली. मृतक इसमाचे नाव सतीश प्रेमलाल पटले(६५) रा. गूढरी, तालुका साकोली, जिल्हा भंडारा असे आहे. वृत्त लिही पर्यंत लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सतीश पटले हे आपली दुचाकी क्रमांक एमएच ३६ पी ५२३८ ने डिझेल आणण्याकरिता साकोली येथे गेले होते.
डिझेल घेऊन स्वगावी जांभळी-निलागोंदी मागार्ने येत असताना गुढरी फाट्याजवळ समोरचे वाहनाला साईड देण्याकरिता टिप्पर क्रमांक एमएच ४० एके ३६१४ चा चालक टिप्पर मागे घेत असताना दुचाकीला धडक लागून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. अपघाताचा आवाज गावात आल्याने गावकरी घटनास्थळी आले व कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. कुटुंबीयांनी गंभीर जखमी सतीश पटले याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेले. कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाºयाने तपासून त्याला मृत घोषित केले. अपघातात दुचाकीचा चेंदामेंदा झाला होता. या घटनेने गुढरी गावावर शोककळा पसरली आहे. वृत्त लिही पर्यंत लाखनी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.