भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- अक्षरक्रांती फॉउंडेशन व कला गौरव संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय (दि. २८ व २९ डिसेंबर २०२४ ला) अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव, ज्योती सावित्री विचारपीठ परिसर, महात्मा फुले शिक्षण संस्था रेशीमबाग नागपूर येथे संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाला मागील १७ वर्षांपासून जपान टोकियोला राहत असणाºया प्रसिद्ध लेखिका व प्रख्यात कादंबरीकार “उर्मिला देवेन” ह्यांना मंचावर विशेष अतिथीचा मान भेटला. उर्मिला देवेन ह्या मूळच्या राजेदहेगाव (इंदिरानगर) भंडाराच्या रहिवासी असल्याने भंडारा जिल्ह्यासाठी हि अभिमानाची गोष्ट आहे. उर्मिला देवेन ह्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली. ह्याच महोत्सवात त्यांची कादंबरी “द गेम आॅफ अफेअर” चा प्रकाशन सोहळा पार पडला.
ह्या महोत्सवाचे संमेलनाध्यक्ष मा. सुरेश पाचकवडे (प्रसिद्ध साहित्यिक, अकोला), विशेष अतिथी मा. डॉ. रवींद्र शोभणे (अध्यक्ष : ९७ वे अ. भा. म. सा. संमेलन, अमळनेर), विशेष अतिथी मा. उर्मिला देवेन (प्रसिद्ध कादंबरीकार टोकियो जपान), मुख्य अतिथी मा. डी. बी. जगत्पुरीया (विख्यात कवी, समीक्षक व ज्येष्ठ पत्रकार, छ. संभाजी नगर) तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून साहित्य प्रेमी, अक्षरक्रांती फॉउंडेशन व कला गौरव संस्था नागपूर चे पदाधिकारी उपस्थित होते. साहित्यिक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे काम प्रामुख्याने करत असतात असेच विदर्भातील भंडारा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, अमरावती जिल्हा इत्यादींच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम साहित्यातून व्हावे असे कडकडाची विनंती करण्यात आली. ह्या कार्यक्रमात उर्मिला देवेन ह्यांनी त्यांचा लेखणीचा प्रवास आणि लेखकांचे कार्य, व लेखकांच्या जवाबदारीबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच माय मराठीशी घट्ट जोडून ठेवण्याच्या प्रामाणिक प्रयत्नासाठी आयोजकांचे विशेष आभार मानले.