माजी खा. सुनिल मेंढेनी केली निर्माणाधीन बायपास मार्गाची पाहणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: सततची होणारी वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना होणारा मनस्ताप लक्षात घेता बायपास मार्गाचे काम पूर्ण होऊन तो लोकांच्या सेवेत यावा यासाठी माजी खासदार सुनिल मेंढे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आज प्रत्यक्ष निमार्णाधीन असलेल्या या मार्गाची त्यांनी पाहणी करून महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व विकासक कंपनी यांच्या सोबत चर्चा केली. सदर मार्गाचे ३ पदरी बांधकाम पूर्ण झाले असून हा मार्ग येत्या जानेवारी २०२५ अखेर पर्यंत सुरू होईल, असा विश्वास भेटीनंतर माजी खा. सुनिल मेंढे यांनी व्यक्त केला. गत काही महिन्यांपासून भंडारा शहा- राबाहेरून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने आज माजी खा. सुनिल मेंढे यांनी प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी मेंढे यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरू असलेल्या कामाला भेट दिली. वैनगंगा नदीवर कोरंबी येथे सुरू असलेल्या पूल बांधकामाची पाहणी केली. पाहणी दरम्यान ६ पदरी मार्गापैकी एका बाजूचे ३ पदरी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याचे लक्षात आले.

यावेळी माजी खा. सुनिल मेंढे यांनी इतरही तांत्र्-ि ाक बाबी जाणून घेतल्या. यावेळी माहिती देताना सुनिल मेंढे म्हणाले, भंडाºयातील वाहतुकीची कोंडी आणि होणारी गैरसोय लक्षात घेता खासदार असताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बायपास मार्गाची मागणी मी केली होती. कायमच भंडारा जिल्ह्याच्या पाठीशी असलेल्या नितीनजी यांनी मागणी मान्य केली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सदर मार्ग जानेवारी २०२३3 पर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र नदीवरील पुलाच्या डिझाईन मध्ये करण्यात आलेला बदल आणि भिलेवाडा येथे नवीन अधिकच्या पुलाची निर्मिती यामुळे वेळ गेला. आज ६ पदरी मार्गापैकी ३ पदरीचेकाम पूर्ण झाले आहे. उरलेले ३ पदरीचे कामही मार्च मध्ये पूर्ण होईल. मात्र तो पर्यंत तयार झालेल्या ३ पदरी मार्गावरून वाहतूक सुरू करावी, असा प्रयत्न आपला राहणार आहे. या दृष्टीने बोलणे झाले असून जानेवारी २०२५ अखेर पर्यंत एका बाजूने वाहतूक सुरू होईल, अशी अपेक्षा सुनिल मेंढे यांनी व्यक्त केली.

महामार्ग प्राधिकरण आणि विकासक कंपनीच्या अधिकाºयांशी बोलून त्यांना या संदर्भात निर्देश दिले असल्याचेही माजी खा. सुनिल मेंढे म्हणाले. तसेच येणाºया काळात लगेच मुजबी ते भंडारा शहरातून जाणाºया महामार्गाचे व भंडारा-तुमसरबालाघाट या महामार्गाचे काम सुरु होणार असल्याचे म्हणाले. याप्रसंगी महामार्गाचे अधिकारी विलास इंगळे, प्रशांत शिरभाते, एन. के. रावत, सुधीर पवार, प.स. भंडारा सभापती सौ.रत्नमाला चेटूले, उपसभापती प्रशांत खोब्रागडे, भाजप शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, प्रशांत निंबोळकर, शैलेश मेश्राम, शिव आजबले, राजू भोजवानी, राजेश टीचकुले, विनोद भुरे, बंटी तांडेकर, प्रशांत पुरुषार्थी, सचिन तिरपुडे, डीम्मू शेख, फईम सय्यद, रमेश चोपकर, गुरु पटेल, रमेश साकुरे, अजय ब्राम्हणकर, सौ. चंद्रकला भोपे, श्रद्धा डोंगरे, माधुरी तुमाने, जया हिंगे, मनीषा भुते व आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *