भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नाकाडोंगरी:- भंडारा वन विभाग अंतर्गत येणाºया लेंडेझरी वनक्षेत्रातील नियतक्षेत्र देवनारा कक्ष क्रमांक ६२ मध्ये एक नर जातीचा वाघ मृतावस्थेत आढळून आला. सदर घटना आज दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी उघडकीस आली. घटनेची माहिती प्राप्त होताच वनधिकारी वनकर्मचारी पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार (रडढ) कार्यवाही करण्यात आली. पशुधन विकास अधिकारी नाकाडोंगरी डॉ.बारापात्रे व पशुधन विकास अधिकारी हरदोली डॉ. शुभम थोरात,पशुधन विकास अधिकारी ( विस्तार) तुमसर डॉ.सुरज पाटील नवेगाव नागझिरा प्रकल्पाचे पशुवैध्यकिय अधिकारी डॉ. मेघराज तुलावी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली. या वेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण(ठळउअ)चे प्रतिनिधी म्हणून ठॠड ( ) श्री. शाहिद खान व प्रधान मुख्य वन संरक्षक( वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपुर यांचे प्रतिनिधी म्हणून भंडारा जिल्हा चे मानद वन्यजीव रएअळ रक्षक श्री. पंकज देशमुख उपस्थीत होते.
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत वाघाचे शवविच्छेदन केले. सदर वन्य प्राण्याचा मृत्यू हा विषबाधेने झाला असावा असा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त करीण्यात आला आहे. वन्यप्राणी वाघ हा नर जातीचा अवयस्कर साधारण १४ ते १६ महिने वय असल्याचा अंदाज आहे. सदर वन्य प्राणी वाघाचे सर्व अवयव शाबूत होते. संपूर्ण कार्यवाही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण च्या प्रमाणभूत कार्यप्रणालीनुसार (रडढ ) मृत वाघचे शवविच्छेदन चिचोली आगार येथे करण्यात आले व तदनंतर त्याचे शव दहन करण्यात आले. मृत वन्य प्राण्याचे अवयवांचे नमुने घेण्यात आले असून ते उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात येतील. प्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपासाची कार्यवाही उपवनसंरक्षक, भंडारा श्री.राहुल गवई यांचे मार्गदर्शनात, प्रकाष्ट निष्काशन अधिकारी श्री.रितेश भोंगाडे व वनपरिक्षेत्र अधिकारी लेंडेझरी श्री. वैद्य हे करीत आहेत.